म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा लोणखेडा कॉलेज येथे संपन्न झाल्या, या स्पर्धेत वेगवेगळे 14 आणि 17 या वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
त्यात 17 वर्षे आतील मुलींनी 100 मीटर धावणे स्पर्धेत भूमिका धर्मराज पाटील आणि धनश्री अनिल पाटील या दोन्ही विद्यार्थिनींची प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हा पातळीवर निवड झाली. तसेच 400 मीटर रिले 17 वर्षे वयोगटात मुलींनी बाजी मारली यात तनिष्का योगेश पटेल , मानसी राजेंद्र पाटील , तनिशा अरविंद पाटील ,भूमिका धर्मराज पाटील आणि धनश्री अनिल पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पातळीवर निवड केली .1500 मीटर मध्ये तनिष्का योगेश पटेल या विद्यार्थिनींनी यश मिळवून जिल्हा पातळीवर निवड झाली .
तसेच थाळीफेक मध्ये तनिशा अरविंद पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पातळीस पात्र ठरली आणि दीप प्रवीण आमोदकर या विद्यार्थ्याने हातोडा फेक यात यश संपादन करून जिल्हास्तरावरती निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिएटिव स्कूलचे प्राचार्या अनिता चौधरी क्रीडा शिक्षक मनोज राजे यांचे विजयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ.सचिन चौधरी , डॉ.विवेक पटेल आणि पंकज पटेल यांनी विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.