शहादा l प्रतिनिधी
जिल्हा जात पडताळणी समिती नंदुरबार अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी मंडणगाव पॅटर्नची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रिये बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्य शासनाच्या वतीने जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यां जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते.या प्रमाणपत्र काढण्यासाठी मंडणगाव पॅटर्ननुसार अर्ज दाखल करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती नंदुरबारचे सहाय्यक संशोधन अधिकारी सी.के.पाडवी यांच्यासह तालुका समन्वयक जयश्री पटेल, हिम्मत करणकाळे यांनी भेट दिली.
यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे व पुराव्यांबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या. प्रस्ताव पाठवण्यासाठी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्र स्थापन करून महाविद्यालयातील संबंधित लिपिकाकडे विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत. लाभार्थी विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रस्ताव महाविद्यालयात जमा करून लवकरात लवकर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल यांची उपस्थिती होती.यावेळी पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश, प्रा.व्ही.सी. डोळे, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा.सी.आर. पटेल,प्रा. जे.पी.चौधरी, प्रा. विशाल पाटील,प्रा. योगिता पाटील, प्रा.मधुकर ठाकरे,प्रा.उदय पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक शशिकांत महिरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मनोज चौधरी यांनी मानले.