Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम

Mahesh Patil by Mahesh Patil
December 2, 2022
in Uncategorized
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार  l

 

एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद होऊन आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.

 

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतो. फी भरली की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते.

 

 

एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे.

 

 

 विजय सिंघल म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा संदेश आहे. त्यानुसार योजना राबविण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशा प्रकारे ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मंजुर अल्पसंख्यांक महिला वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

Next Post

पोलीसांनी धाड टाकत दिड लाखाचा गांजा केला जप्त, एकास अटक

Next Post
पोलीसांनी धाड टाकत दिड लाखाचा गांजा केला जप्त, एकास अटक

पोलीसांनी धाड टाकत दिड लाखाचा गांजा केला जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,711 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group