सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. जि. नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शरद बागुल, प्रमुख अतिथी प्रल्हाद संदानशिव व संदीप ईशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
योगेश हिरे यांनी कविता सादर केली. तसेच श्री संदानशिव व श्री ईशी यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक प्रसंग आपल्या मनोगतातून सांगितले.
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत देशाचे संविधान निर्माण केले. म्हणून आपण परिस्थितीच्या बाऊ न करता परिश्रम घेतले पाहिजे.”असे मत प्राचार्य श्री बागुल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा गावित यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण शिवदे, रवींद्र पाडवी व सुषमा गावित यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








