धडगाव | प्रतिनिधी
केंद्र शासन व नाबार्ड यांच्या महत्वाकाशी १० हजार शेतकरी उत्पादक कपनी स्थापना कार्यक्रमाच्या माध्यामातून डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर (DSC) संस्थेने अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात अमोप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली.
या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मोलगी गावात पार पडली.या बैठकीत नाबार्ड चे DDM प्रमोद पाटील यांच्या हस्ते कंपनी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र देण्यात आले.या बैठकीमध्ये प्रमोद पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य, उद्देश, शेअर व मुल्य साखळी विषयक माहिती तसेच रब्बी हंगाम साठी बियाणे-खते यांची एकत्रित खरेदी, उत्पादित मालाची विक्री इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमोद पाटील , कंपनी कार्यक्षेत्रातील संचालक व शेतकरी उपस्थित होते.नाबार्डचे DDM प्रमोद पाटील , DSC संस्थेचे कार्यकारी संचालक मोहन शर्मा , विभागीय व्यवस्थापक कृष्णा चव्हाण , प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शन खाली कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी स्थापनेसाठी आसिफ शेख, पंकज ठाकरे,सुरज मंडोल राकेश पावरा संस्थेचे प्रतिनिधी व 10 गावातील बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.