Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रशासनाला सोबत घेऊन डाकीण प्रथा निर्मूलनासाठी प्रयत्न करणार, अंनिसचा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Mahesh Patil by Mahesh Patil
September 6, 2021
in सामाजिक
0
प्रशासनाला सोबत घेऊन डाकीण प्रथा निर्मूलनासाठी प्रयत्न करणार, अंनिसचा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय
तळोदा |  प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बैठक आज तळोदा येथे पार पडली.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.’अंनिस विचार संवाद यात्रा’ काढून डाकीण प्रथा उच्चाटनासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.
         बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र अंनिसच्या तळोदा शाखा उपाध्यक्ष तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे,अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,जिल्हा प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे,समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा निलेश गायकवाड,तळोदा शाखा अध्यक्ष मंगलसिंग पाटील आदी उपस्थित होते.
           बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील संघटना बांधणी,शाखा कार्यकारी रिपोर्टिंग, संघटना वाढ व विस्ताराच्या शक्यता, जबाबदारी, नवीन ठिकाणी शाखा सुरू करणे याबाबत तालुकानिहाय कालबद्ध नियोजन करण्यात आले.जिल्हास्तरीय दोन दिवसीय संघटना बांधणी शिबिर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
            बैठकीत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाअंतर्गत आतापर्यंत घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांच्या सहकार्याने आश्रमशाळा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.प्रशिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावर आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. त्यात सोशल मीडिया व्यवस्थापन व डिजिटल डॉक्युमेंटेशन शिबिर घेण्याबाबत देखील बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय अंनिसच्या  कामात जिल्ह्यात युवांचा सहभाग वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवणे व त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे व महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करणे व आखणी करणे इत्यादी विषयांवर देखील बैठकीत चर्चा झाली.या जिल्हा बैठकीला नंदुरबार,शहादा,नवापूर, अक्कलकुवा,येथील अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
                बैठकीचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तळोदा शाखेच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीच्या यशस्वितेसाठी तळोदा शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, प्रधान सचिव अमोल पाटोळे, प्रा सुनील पिंपळे,प्रा डॉ प्रशांत बोबडे प्रा रविकांत आगळे,प्रा राजू यशोद,अनिल निकम,स्वप्निल महाजन,आदीनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले.
 डाकीण प्रथा उच्चाटनासाठी प्रशासनासोबत प्रयत्न करणार
                नंदुरबार जिल्ह्यात आज ही डाकीण प्रथेचा प्रश्न गंभीर असून अनेक महिला या प्रथेला बळी पडत आहेत.नुकतेच अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील डाकीण प्रकरणात अंनिसच्या माध्यमातून महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासह सातपुडा अनेक महिलांना डाकीण ठरवून त्यांचा छळ केला जात असल्याचे प्रकरणे घडत असून सातपुड्यातील डाकीण प्रथेच्या उच्चाटनासाठी प्रशासनाला सोबत घेऊन काम करण्याची निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या संबंधी चर्चा करत असताना पोलीस प्रशासन डाकीण पीडित महिलेची  तक्रार नोंदवून घेताना उदासिनता दाखवत असल्याची बाब समोर आली. डाकीण प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा या संदर्भात अंनिसच्या वतीने प्रबोधन अभियान राबवण्यात बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.याशिवाय येत्या काही दिवसात महाराष्ट्र अंनिसच्या  वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात असलेल्या धडगाव,मोलगी,अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात ‘अंनिस विचार संवाद यात्रा’ काढून या यात्रेच्या निमित्ताने सातपुड्यातील डाकीण प्रथेच्या विरोधात प्रशासनाला सोबत घेऊन प्रबोधन मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक उत्साहात साजरा

Next Post

मोलगी परिसरात अमोप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

Next Post
मोलगी परिसरात अमोप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

मोलगी परिसरात अमोप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group