नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत २७ व २८ ,२९ तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचा हस्ते करण्यात आला, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रकल्पाधिकारी मिनल करनवाल, लक्ष्मण माळी उपस्थित आदी होते.
नंदुरबार प्रकल्प अंतर्गत नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रत्येकी 12 संघ सहभागी होणार आहे.क्रीडा स्पर्धेत ५४७ मुले व ५३३ मुली असे एकूण १०८० खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत पहिल्या दिवशी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल हे सांघिक खेळ तर दुसर्या दिवशी धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी असे वैयक्तिक खेळ होणार आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत मोठा उत्साह दिसून आला.स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. एन.काकडे, एस.एल.हिप्परगे, जिजा पाडवी, किशोर गोसावी, राहुल पवार, शैलेश पटेल ,एस. एम.चौधरी,एन.आर.माळी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.