Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरा फाट्याजवळ २० लाखांची विदेशी दारू जप्त

team by team
November 28, 2022
in क्राईम
0
दरा फाट्याजवळ २० लाखांची विदेशी दारू जप्त

शहादा l प्रतिनिधी

अवैधरित्या विनापरवाना विदेशीदारूची तस्करी करणारे वाहन शहादा पोलिसांनी काल पहाटेच्या सुमारास पकडले. यात 19 लाख 80 हजार रुपयाची विदेशी दारू व 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा सुमारे 24 लाख 80 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व त्याचा एक सहकारी वाहन सोडून पसार झाले आहेत. ही घटना शहादा-म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार व पो.कॉ.अनमोल राठोड हे म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे गस्त घालत असताना त्यांना एक वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येताना दिसले. त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पोलीसांच्या वाहनाला एका बाजूला धडक देऊन म्हसावद रस्त्याकडे वेगाने पळाले. या घटनेची माहिती तात्काळ म्हसावद पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नाकाबंदी केली असता म्हसावद पोलिसांच्या वाहनालाही धडक देत संशयितांनी तोरणमाळ रस्त्याकडे पळ काढला. मात्र घाट रस्ता असल्याने चालकाने व त्याचा साथीदारासह वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

पोलिसांनी बोलेरो वाहन (क्रमांक एमएच – 08-एच- 8985) शहादा पोलीस ठाण्यात आणले. त्यात ब्लेंडर व्हिस्की (Blender whiskey) या विदेशी दारूने भरलेल्या 3 हजार बाटल्यांचे 250 खोके आढळून आले. या दारूची किंमत 19 लाख 80 हजार इतकी असून बोलेरो वाहनाचे 5 लाख असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पो.कॉ. अनमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीतांविरुद्ध विनापरवाना अवैधरीत्या दारूची वाहतूक व शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय वाहनास धडक देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन नेऊन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकराशे खेळाडू सहभागी

Next Post

शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

Next Post
शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add