नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या ७० दिवसापासून चालू असलेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही १४ दिवसापासून महाराष्ट्रातून प्रवास करत आहे.आता ही यात्रा अंतिम टप्यात असून महाराष्ट्रातील जळगाव परिसरातील भेंडवळ ते जळगाव(जामोद),निमखेडी या परिसरात ही यात्रा चालू आहे.या यात्रेचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा हा निमखेडी येथे आहे .भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हे संपूर्ण भारत भ्रमण पदयात्रेने करत आहेत. त्या दृष्टीने भारतातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्याबरोबर रस्त्याने पायी चालत आहे व त्यांचे मनोबल उंचावीत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बोरद परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तुळाजा तालुका तळोदा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते ही मोठ्या उत्साहात भजनी मंडळासह आपल्या नेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या चार दिवसापासून शेगांव कडे रवाना झालेले आहेत.त्यांनी राहुल गांधी यांच्या सोबत भेंडवळ ते जामोद पर्यंत या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.
यात सहभागी कार्यकर्त्यांमध्ये तुळाजा येथील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.सहभागीमध्ये संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य सचिन राहसे,सेवा दल अध्यक्ष प्रकाश पवार, चूनीलाल ब्राम्हणे,पोलीस पाटील रतीलाल डूमकुल, मुन्ना वळवी, ईश्वर डूमकुल,विष्णू वळवी, बिंद्या खर्डे, विनोद भोसले,भाईदास पावरा, विकास जाधव, आणि यात महिला देखील होत्या होत्या त्याचबरोबर काही कार्यकर्ते देखील होते.