भालेर ता.नंदुरबार येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना पुरस्कार मिल्याबद्दल तसेच पोलीस निरीक्षक
अरविंद पाटील यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन युनिव्हर्सिटी व निती आयोग पुरस्कृत भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. चंद्रकांत पाटील साहेब( विषय तज्ञ) यांचा संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्या सौ विद्या चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी श्री.कदम व श्री.पाटील यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिसर व शालेय गुणवत्ता प्रगतीविषयी कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्ह्यात ओबीसी संवर्गातून प्रथम क्रमांकाने पीयूष आनंदा पाटील व आठव्या क्रमांकाने हर्षदा गवरलाल पाटील हे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) गुणवत्ता यादीत येतात या विषयी भरभरून कौतुक केले व शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल कुवर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.