शहादा l प्रतिनिधी
मनरद ता,शहादा येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक उद्योजक ड्रीम कंट्रक्शन,नंदुरबार चे संचालक किरण तडवी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला
संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष गुलाब नाईक,महिला प्रदेश अध्यक्षा सौ दीपा वळवी,महिला शहर अध्यक्ष सोनल ठाकरे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष राकेश जाधव, शहर प्रमुख गणेश सोनवणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष विजय ठाकरे यांच्या सह विविध पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.