Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

team by team
November 7, 2022
in कृषी
0
तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब
बोरद l प्रतिनिधी
  तळोदा येथून बोरद रस्त्याला अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेले तळवे हे गाव जळगावच्या धर्तीवर केळीसाठी नवा हब ठरू पाहत आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,तळोदा तालुका हा सर्वत्र बागायत तालुका म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.अशा या तळोदा तालुक्यात तळवे या गावी अनेक मोठमोठाले शेतकरी आपली शेतजमीन कसत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रयोग राबवून आपल्या शेतीमधून उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी येथील शेतकरी प्रसिद्ध आहेत.
 याचेच वैशिष्ट्य म्हणजे तळवे ह्या गावाचा संपूर्ण  भौगोलिक विस्तार पहिला तर हे गावं ३६५.५९ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. तर शेतीयोग्य जवळजवळ ३५०० हेक्टर शेतजमीन या परिसरात येते. या ३५०० हेक्टर अंतर्गत मोठमोठाल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने ते आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण पिक घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक प्रकारच्या केळीच्या जाती  आपल्या शेतात लागवडीसाठी आणल्या जातात त्यामध्ये टिशू रोपांना अधिक महत्व दिले जाते.अर्थात केळीबाबत नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी राबविताना शेतकरी दिसून येतात.नवती तसेच कांदेबाग या दोन टप्प्यात उत्पादन घेतले जाते.
   केळी उत्पादनाबाबत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने जळगांव जिल्हा हा केळीउत्पादनात प्रथम क्रमांकावर येतो.त्याच धर्तीवर तळोदा तालुक्याचा जर विचार केला तर तळवे हे गावं तालुक्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे गाव म्हणून आजच्या घडीला पाहिल्याक्रमांकवर आहे.साधारणतः ५०० ते ७०० हेक्टर जमिनीत हे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल बोरद गावाचा क्रमांक येतो. परंतू व्यापारी दृष्ट्या तळवे परिसरातील केळीला निर्यातीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. म्हणून तळवे हे गावं केळीचा हब बनू पाहत आहे.
     येथील शेतकरी केळीबाबत विविध ठिकाणी भेटी देऊन उत्पादन वाढीबाबत माहिती घेत असतात व निर्यातक्षम उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात व त्यात ते यशस्वी ही होतात.
     उत्तर भारतातील व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात.व गुणवत्तापूर्ण केळीला निर्यातीच्या दृष्टीने योग्य भाव देऊन खरेदीही करतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे उत्पादन चांगले असूनही भाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.मात्र आता परिस्थिती सुधारली आहे.शेतकरी जोमाने केळीचे उत्पादन घेत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल भव्य सत्कार

Next Post

दोघा बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बालिकेचा मृत्यू, न्यायालयाने ठोठावली चार दिवसांची पोलीस कोठडी

Next Post
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

दोघा बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बालिकेचा मृत्यू, न्यायालयाने ठोठावली चार दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add