Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोघा बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बालिकेचा मृत्यू, न्यायालयाने ठोठावली चार दिवसांची पोलीस कोठडी

team by team
November 7, 2022
in क्राईम
0
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

नंदुरबार|  प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करून १५ वर्ष मुलीवर चुकीचा औषधोपचार करत तिचा मृत्यूस कारणीभूत झाल्याचा कारणावरून दोघा बनावट डॉक्टर पिता पुत्रा विरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे गावातील डॉ.राजेंद्र उर्फ राजु श्रीपद पाटील व डॉ.विनोद राजेश (राजेंद्र) पाटील यांनी अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करून यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परीक्षेचे नोंदणी/ परवाना नसतांना त्यांनी परवाना असल्याचे भासवून त्यांच्या राहत्या घरी मंगलाई नावाचे क्लिनीक चालवून अनधिकृतपणे व्यवसाय केला तसेच दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील कु.चेतना दिगंबर पाटील (वय १५) रा.सुलतानपूर (ता.शहादा) हिच्यावर राहत्या घरात चालवत असलेल्या रूग्णालयामध्ये इंजेक्शन देवून चुकीचे औषधोपचार केला.

या औषधोपचारामुळे कु.चेतना पाटील हिचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपासणी करून अहवालानुसार चेतना पाटील हिचा मरणाबाबत डॉ.राजेंद्र पाटील, विनोद पाटील यांच्या उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचा अहवाला आल्याने  पोलीस उपनिरीक्षक सुनिल पद्माकर बिर्‍हाडे  यांच्या फिर्यादीवरून म्हसवद पोलीस ठाण्यात डॉ.राजेंद्र उर्फ राजु श्रीपद पाटील व डॉ.विनोद राजेश (राजेंद्र) पाटील  दोघे रा. सुलतानपूर (ता.शहादा) ह.मु.साई सेवाराम नगर (शहादा) यांच्या विरूध्द ३०४,  ४१९, ४२०, २७६, ३४ सह महावैद्यकीय व्यवसायी अधी, १९६१ कलम ३३, ३३, (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.याप्रकरणी दोघांना अटक करून शहादा न्यायालयात हजर केले असता त्यां दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

Next Post

29 लाखाच्या बेकायदेशीर विदेशी मद्यासह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post
29 लाखाच्या बेकायदेशीर विदेशी मद्यासह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

29 लाखाच्या बेकायदेशीर विदेशी मद्यासह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add