नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री पदी तथा नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित यांची निवड झाल्याबद्दल तसेच संसद रत्न खा. डॉ, हिना गावित यांचा मोलगी परिसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोलगी येथे नागरी सत्कार करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांची तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी डॉ, सुप्रिया गावित व संसद रत्न डॉ.हिना गावित यांच्या यांची नियुक्ती झाल्याबद्दल मोलगी येथे मोलगी परिसर भाजपा तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉक्टर कांतीलाल टाटिया, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी ,पंचायत समितीचे सदस्य अशोक राऊत, मोलगीचे सरपंच मनोज तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, रोशन पाडवी, माजी सरपंच दिलीप वसावे, पंचायत समिती सदस्य भरत पाडवी यांच्यासह तालुक्यातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच तसेच ग्रामपंचायत सद्स्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.