नंदुरबार l प्रतिनिधी
नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्या आणि जन्मनोंदणी होऊन 15 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिक अथवा त्यांच्या पाल्यांनी जन्मनोंदणीमध्ये नावाची नोंदणी करावी. नावाची नोंदणी 27 एप्रिल 2026 पर्यंत करता येईल. यामध्ये 1969 पूर्वींच्या जन्म नोंदणीचादेखील समावेश आहे.
नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरिकांनी संपर्क साधावा. यानंतर कोणत्याही परिस्थितीत जन्मनोंदणी मध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) डॉ. नितीन बोडके यांनी कळविले आहे.