नंदुरबार l
शहादा तालुक्यातील काथर्दा खुर्द येथील मुकादम व ऊसतोड मजूरांनी नांगाव (वाळवा ता.सांगली) येथील व्यावसायिकाची चार लाख रुपये घेऊन ऊसतोड न करता फसवणूक केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील पिंट्या संजू भील (रा.उभादगड), रविंद्र उद्धव पावरा, श्रावण रमण भील, गोपाल विजय भील, अशोक राजाराम चौधरी, बयासिंग दगा सोनवणे, संतोेष चैत्राम माळी, कार्तिक मंगू पाडवी, राजेश भायसिंग सोनवणे, रविंद्र धरम ठाकरे, विजय नानू भील, सरजूबाई झिपा माळी, हर्षद नरोत्तम माळी (सर्व रा.काथर्दा खुर्द ता.शहादा) यांनी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नांगाव येथील व्यावसायिक अभयसिंग विजयसिंग पाटील यांच्याकडून ऊसतोडणी कामासाठी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी ४ लाख रुपये घेतले. मात्र अद्यापपावेतो ऊसतोडणी न करता पैसे परत न करता अभयसिंग पाटील यांची फसवणूक केली. याबाबत अभयसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र ईशी करीत आहेत.








