नंदूरबार l प्रतिनिधी
नर्मदा नदी काठावरील वनविभागाच्या माळ क्षेत्रात नाल्याजवळ साग लाकुड चौपाटीचा साठा मिळून आला. सुमारे 50 नग साग चौपाटाचे मिळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बिलगाव वनविभागाने केली आहे.
धडगाव तालुक्यातील बिलगाव (प्रा) वनक्षेत्रातील माळ परिमंडळामधील नियतक्षेत्र माळच्या नर्मदा नदीकाठावरील भागात नाल्याजवळ ठिकठिकाणी कुर्हाडीने घडतड केलेले साग चौपाट मिळून आले आहे. सुमारे 50 नग मिळून आले असून वनकर्मचार्यांनी सदर लाकूडसाठा जमा करुन वाहनाने धडगाव आगारात आणला आहे.
यात 0.703 घ.मी. असा 23 हजार 975 रुपये किंमतीचा साग चौपाट जप्त केले आहे. याबाबत माळचे वनपाल डी.आर.केळकर यांच्या फिर्यादीवरुन वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळेचे वनसंरक्षक दि.वा.पगार, नंदुरबार वनविभाग शहादाचे उपवनसंरक्षक के.बी.भवर, सहाय्यक वनसंरक्षक एस.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ए.एस.पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली
माळचे वनमाल डी.आर.केळकर, बी.एम.परदेशी, माकडकुंडचे वनपाल एम.एच.तडवी, एस.बी.भंडारी, व्ही.जी.पटले, पवन पाडवी, अनिल पावरा, मंगेश वळवी, अनिल पाडवी, मनिषा पावरा, ज्योती पावरा, पुनम पावरा, वाहनचालक हिम्मत पावरा यांच्या पथकाने केली. तपास माळचे वनपाल केळकर करीत आहेत.








