मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मालपाडा येथे 54 किलो 860 ग्रॅम गांजा सदृश्य अमली पदार्थाचे वनस्पतीचे हिरवे ताजे चार ते सात फुटापर्यंत उंची असलेले 257 रोपे दहा हजार रुपये किलो किंमतीच्या दराने पाच लाख 48 हजार 600 रुपयांचे ज्वारी च्या शेतात लावलेले असल्याने कारवाई करण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील मोलगी पोलीस ठाणे अंतर्गत येणारे मालपाडा येथे आज स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा या वनस्पतीची लागवड स्वतःच्या मालकीच्या ज्वारीच्या शेतात करण्यात आली होती. याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चंद्रसिंग नथ्थू तडवी रा मालपाडा ता अक्कलकुवा यांच्या शेतात लागवड करण्यात आली होती. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० अ,ब,२२ क,४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कृष्णलाल रामचंद्र गुले यांनी दिली आहे. यावेळी अक्कलकुवा येथील पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, मोलगी येथील पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार,पो.ह. अरुण सैंदाणे,पो. काँ.राहुल महाले,पो. कॉ.अनिल नागरगोजे, पो ह दिलवर पाडवी,म.पो.ह सुमन पावरा यांनी केली.