नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भलेर येथील श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या विज्ञान युगात कॉम्प्युटर हे विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे या द्वारे आपण विविध विषयातील बारकावे व त्याची माहिती क्षणात मिळू शकतो व तो भाग न समजल्यास पुन्हा पुन्हा पाहू शकतो व विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होते त्यामुळे डिजिटल क्लासरूम ही काळाची गरज आहे.याविषयी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध विषयांवर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे मार्गदर्शन केले.
श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय भालेर ता.जि. नंदुरबार शाळेस येथे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस ते विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करत होते.शाळेस NIIT FOUNDATION तर्फे INUDS CSR फंडातून डिजिटल रूमसाठी कॉम्प्युटर दिले.त्याप्रसंगी श्रीमती बी. एन.पाटील यांनी गणित विषयाचे अध्यापन केले, एम.एन. पाटील यांनी विज्ञान विषयाचे अध्यापन केले. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील,
प्राचार्य विद्या चव्हाण ,चंद्रशेखर पाटील, सौ कविता पाटील , पर्यवेक्षक एम. बी. अहिरे उपस्थित होते
व्ही व्ही इशी यांनी सूत्रसंचालन केले.
डिजिटल क्लासरूमला सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.