नंदुरबार l प्रतिनिधी
‘काश’ हा लघु चित्रपट ८ देशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला,तसेच बांगलादेश येथे बेस्ट ऍक्टर चे नामांकन मिळालेल्या चित्रपटातील अभिनेते, दिव्य मराठीचे नंदुरबारचे ब्यूरो चीफ रणजितसिंग राजपूत यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात डॉ.सुजित पाटील यांनी ‘काश’ हा लघु चित्रपटाची निर्मिती केली.या चित्रपटात दिव्य मराठीचे नंदुरबारचे ब्यूरो चीफ रणजितसिंग राजपूत यांनी केलेल्या अभिनयाने वेगळीच छाप सोडली.’काश’ हा लघु चित्रपट ८ देशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला,तसेच बांगलादेश येथे बेस्ट ऍक्टर चे नामांकनही मिळाले.एखाद्या लघु चित्रपटातला एवढे पुरस्कार व नामांकन मिळण्याची खानदेशातील पहिली घटना असावी.’काश’ हा लघु चित्रपटासह अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली.यातील अभिनेते रणजितसिंग राजपूत हे दिव्य मराठीचे नंदुरबार जिल्हा ब्यूरो चीफ म्हणून काम करत आहे. पत्रकारिते सोबतच विविध कलागुणांचा एक खजिनाच आहे.त्यांना अभिनयासोबतच, गायन, वकृत्व आदी गोष्टींची आवड आहे.

‘काश’ हा लघु चित्रपट ८ देशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला,तसेच बांगलादेश येथे बेस्ट ऍक्टर चे नामांकन
मिळाल्याने श्री.महाराणाप्रतापसिंह युवक मंडळ,श्री क्षत्रिय राजपूत समाजातर्फे त्यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी समाज बांधवांनी त्यांच्या घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला.यावेळी मोहिनिराज राजपूत यांच्या सह समाजातील विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.