नंदुरबार l प्रतिनिधी
खांडबारा – नंदुरबार रस्त्यावरील वाटवी गावाजवळ प्रवाशी रिक्षा पलटी झाल्याने अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि.24 रोजी चार वाजेच्या सुमारास खांडबाऱ्याहून रिक्षा सामान भरून भादवडकडे जात असताना ॲपेरिक्षा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावर पलटी झाल्याने अपघात घडला.या अपघातात रवींद्र विजा वळवी ( वय २३ ) रा . बिजगाव ता.नवापूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रोहन रवींद्र वळवी रा . कुंभारपाडा, ता.नवापूर हा गंभीर जखमी झाली आहे . रिक्षात एकूण दोनच प्रवासी होते . घटनास्थळी खांडबारा पोलिस प्रवीण अहिरे व गावित यांनी अपघातग्रस्तांना मदत करत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .