नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील दि.11 ऑगस्ट रोजी अखेरचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा तूर्त कोरोनामुक्त झाला होता.आज दि.21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 10 दिवसांनंतर कोरोना रुग्ण आढळला आहे.
आतापर्यंत नंदुरबार जिल्हयातील ९ ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे . यात नंदुरबार तालुक्यातील ३८८ , शहादा तालुक्यातील २३५ , तळोदा तालुक्यातील ९९ , नवापूर तालुक्यातील १७८ , अक्कलकुवा तालुक्यातील २७ , धडगाव तालुक्यातील २३ रुग्णांचा समावेश आहे . जिल्हयात ३७ हजार ७०० रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले होते . यात नंदुरबार तालुक्यातील १६ हजार २२ , शहादा तालुक्यातील ११ हजार ६८६ , तळोदा तालुक्यातील ३ हजार ७८० , नवापूर तालुक्यातील ४ हजार १४५ , अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार २०४ तर धडगाव तालुक्यातील ८६३ रुग्णांचा समावेश होता .
जिल्हयातील ३६ हजार ७५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . यात नंदुरबार तालुक्यातील १५ हजार ६३४ , शहादा तालुक्यातील ११ हजार ४५१ , तळोदा तालुक्यातील ३ हजार ६८१ , नवापूर तालुक्यातील ३ हजार ९ ६७ , अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार १७७ , धडगाव तालुक्यातील ८४० रुग्णांचा समावेश आहे . दरम्यान , जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण दि.11 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याने संपुर्ण जिल्हा तूर्त कोरोनामुक्त झाला होता.दरम्यान आज दि.21 ऑगस्ट रोजी 93 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.त्यात नंदुरबार शहरातील श्रीजी पार्क मधील एकाचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह
आला त्यामुळे जिल्ह्यात सध्या स्थितीला एक रुग्ण आहे.तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.