नंदुरबार l प्रतिनिधी)-
भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी भारतीय किसान सेनेचे प्रदेशअध्यक्ष पंडित तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष शाहिद मंसूरी यांनी दिले.
भिलीस्थान लायन सेनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच नंदुरबार येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी पंडित तडवी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष विप्सी वसावा, प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी,सनी सोनवणे, जगदीश वसावा,कल्पेश वसावा, मुकेश वसावा, जयदीप वसावा,अक्षय वसावा, गोपी मन्सूरी, प्रल्हाद वसावा, सुनील वसावा,अल्पेश वसावा,संजय वसावा उपस्थित होते.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी नेहमी आदिवासी समाजासाठी व शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी झटत असतात. भारतीय किसान सेनेच्या माध्यमातून त्यांनी नंदुरबारच्या जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या प्रसंगी बांधावर जाऊन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.