नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील करजकुपा येथे शिवीगाळ करू नको, असे विचारना केल्याचा रागातून सात जणांनी दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबालाल मुरार पाटील यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. त्यासाठी जामीनदार असलेल्या नरेंद्र राजाराम पाटील यांना बँकेने नोटीस दिली. त्याचा राग येवून नरेंद्र पाटील यांनी अंबालाल पाटील यांना शिवीगाळ केली. याबाबत शिवीगाळ करू नको, असे सांगण्याचा राग येवून आता तुम्हाला गावात राहू देणार नाही. तुम्हाला मारून टाकू अशी दमदाटी करून नरेंद्र पाटील यांनी हातातील काठीने पोपट पुंजू पाटील यांना मारहाण केली. तसेच अंबालाल पाटील यांना मारहाण केली म्हणून पोपट पुंजू पाटील रा.करजकुपा (ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात नरेंद्र राजाराम पाटील, कुणाल नरेंद्र पाटील, बुधा गोपाल पाटील, राजाराम गोविंद पाटील, विनोद धिरजी पाटील, शुभम दिलीप पाटील, दिलीप धिरजी पाटील सर्व रा.करजकुपा (ता.नंदुरबार) यांच्या विरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, १४८, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधा पाटील व राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई देविदास सोनवणे करीत आहेत.