नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथे अल्पवयीन युवकाचे अपहरण केल्याची घटना घडली . याप्रकरणी अनोळखींविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील रविंद्र हिंमत पाटील यांचा १६ वर्षीय मुलगा हितेश रविंद्र पाटील यास कोणीतरी पळवुन नेले . घरासमोरील अंगणातुन हितेश याचे अज्ञाताने अपहरण केले आहे . याबाबत रविंद्र पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखींविरुध्द भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .