नंदुरबार l प्रतिनिधी –
सुरत – भुसावळ लोहमार्गावर नवजीवन एक्सप्रेस या धावत्या रेल्वे गाडीच्या धडकेत अनोळखी इसम जागीच ठार झाला .
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा नवजीवन एक्सप्रेस या धावत्या रेल्वे गाडीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला . याबाबत नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती . तसेच मयतांची ओळख पटविण्याचेही आवाहन पोलीसांनी केले होते . त्यानुसार मयत व्यक्तीची ओळख पटली आहे . तपास हेकॉ.प्रकाश गोसावी करीत आहेत .