नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून कारगिल युद्धातील माजी सैनिक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी जिजाबराव पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सन्मान करण्यात आला, ह्यावेळी पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, अरुण गर्गे, अविनाश सोनेरी आदी उपस्थित होते.यावेळी शाळेचा परिसर भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणानी गजबजला प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.
यावेळी जिजाबराव पाटील यांनी 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कारगिल येथे झालेल्या युद्धातील स्वतः अनुभवलेले थरारक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले ह्या मध्ये त्यानी 1999 जुलै महिन्यात आम्ही सर्व सैनिक पॉईंट 4700 मुक्त करण्यासाठी निघालो तेव्हा अचानक फायरिंग सुरू झाली अंदाज होता सकाळी 4 पर्यंत शत्रू शी भेट होईल पण दीड वाजताच कॉन्टॅक्ट झाला आणि दोन्ही बाजूनी तुफान फायरिंग सुरू झाली आम्ही खालून वर पहाडावर जाऊन त्यांना मारलं.
त्यातील काही पाकिस्तानी सैनिक पळून गेले. त्या कामी आमचे 6 सहकारी शहिद झाले सकाळी उजेड पडल्यावर आम्ही आपल्या सैनिकांना शोधलं त्यात एक जवान शांत पणे झोपला होता. शरीरावरच वजन कमी करायला सुरुवात केली. त्याचे बूट काढले छातीला असलेलं म्यागजिन पोचेस काढले,बुलेटप्रूफ जॅकेट काढलं,डोक्याला हेल्मेट होत एकदम घट्ट स्ट्रेप लावलेली डोक्यामागे गेलो,हळूच स्ट्रेप खोलली हेल्मेट हातात घेतलं गोळी कानाच्या मागून मागचा डोक्याचा भाग हेल्मेट मध्ये हातात आला.
क्षणभर काही सुचेना तसच परत हेल्मेट डोक्याला घट्ट लावलं आणि माझ्या शूरवीर जवानाला चार सहकारीच्या मदतीने खाली पाठवलं त्या युद्धात भारताने विजय मिळवला.आज ह्या घटनेस 23 वर्ष झालेत, विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर प्रस्ताविक मनिष पाडवी मांडले कार्यक्रमच्या शेवटी आभार प्रकटन प्रसाद दीक्षित यांनी केले .