नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बदलत्या वातावरणामुळे अतिदुर्गम भागातील साकलीउमर व मोगरा परिसरात साथीच्या आजाराने जनावरे दगावत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषी सभापती गणेश पराडके यांच्या आदेशान्वये जनावरांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे,
गेल्या काही दिवसांपासुन अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीने वातावरणात मोठा बदल झाला आहे पशु संवर्धन विभागामार्फत वातावरणातील बदल लक्षात घेत जनावरांना साथीचा आजार होऊ नये यासाठी दुर्गम भागातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
वातावरणातील बदलामुळे मोकस परिसरातील अनेक जनावरे दगावली आहेत त्याची दखल घेत कृषी सभापती गणेश पराडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लसीकरण व आजारी जनावरांवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यु.डी.पाटील,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी.जे. पावरा,सहा.उपायुक्त डॉ. गणेश पालवे,पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास पाटील,डॉ. जागृत पाटील,डॉ. धैर्यशील राजेपडवल, पशुधन पर्यवेक्षक इंदास वळवी, दिलीप वसावे , राजु गावीत,भोसले आदी लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.