Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

team by team
May 2, 2026
in राजकीय
0
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी उभा आहे, असे वचन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

नंदुरबार येथील सेंट मदर तेरेसा स्कूलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजीत मोरे होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी आपण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू. महायुतीतील घटक पक्षावर अन्याय न करता राष्ट्रवादी पक्षाच्या विस्तार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहुन काळजी घेईन. पक्ष संघटनासाठी सर्वांनी एकत्रित आणि एकदिलाने काम करा.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार ज्या पुरोगामी विचारांवर उभी हयात वाटचाल करीत आले, तो पुरोगामी विचार आम्ही कधीही सोडणार नाही. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढेल, यासाठी अथक प्रयत्न करू.

जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आधुनिक व प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची गाठ श्रद्धा होती. त्यांच्या पुरोगामी विचारांवरील श्रद्धेतूनच नामदार हसरसाहेब मुश्रीफ यांनी महाराष्ट्राचा टोकाचा जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे घेतली आहे.

हक्काच्या पाण्यासाठी आग्रही !
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नर्मदा प्रकल्पांतर्गत अजूनही या विभागाच्या वाट्याचे हक्काचे दहा टी. एम. सी. पाणी उचललेले नाही. यापुढे ते दहा टी. एम. सी. पाणी या विभागाला देण्यासाठी व येथे हरितक्रांती फुलवण्यासाठी मी ऑटोकाट प्रयत्न करीन. शासन दरबारी त्याचा मनापासून पाठपुरावा करीन.

यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

यावेळी पक्षप्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, माजी सभापती रतन पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, तळोदाच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नवापूरचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, महिला जिल्हाध्यक्षा सीमा सोनगिरे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, मधुकर पाटील, नगरसेवक मोंटू जैन, मालती वळवी, जेलसिंग पाडवी, योगेशभाऊ चौधरी, संगीता शिंपी, शितल पाडवी, जाकिरमिया जहांगीरदार, पप्पू कुरेशी, अविनाश गावित यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजीत मोरे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

Next Post

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Next Post
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add