नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील आमलाण गावाची रहिवासी कुमारी ज्योती सुरेश कोकणी ही पोलीस निरीक्षक या पदाची परीक्षा पास होऊन नुकतेच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करून पीएसआय पदी नियुक्ती मिळाल्याबद्दल ज्योती सुरेश कोकणी हीचे सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन करून शुभेच्छा सह कौतुक केले जात आहे.
नवापूर तालुक्यातील आमलाण गावातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कुमारी ज्योती सुरेश कोकणी ही आपल्या शिक्षणानंतर मेहनतीच्या जोरावर पोलीस निरीक्षक पदी मजल मारल्याने कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या माध्यमातून पीएसआय पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमलाण गावातील परिवार व नातेवाईकांनी कुमारी ज्योती सुरेश कोकणी हीचे जोरदार स्वागत करत अभिनंदन केले. यावेळी आमलान गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलगी पीएसआय झाल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.