Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
July 2, 2022
in क्राईम
0
मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मानमोड्या बीटात रात्रीच्या वेळी वनजमीनीवर नांगरटी करतांना वनविभागाने ४ जणांना अटक केली असून 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३० जून रोजी वनक्षेत्र शहादा मधिल मानमोड्या बीटातील कक्ष क्र. ६०२ मधे रात्री १ वाजेचा दरम्यान मलगाव व मध्य प्रदेश येथील ४ संशयित आरोपी टॅक्टर व टिलरच्या साह्याने वनजमीनीवर नांगरटी करतांना शहादा वनक्षेत्रातील वनअधिकारी यांनी

विलास आपसिंग पाडवी, कैलास फत्तेसिंग पटले, खेलसिंग मालसिंग भामरे सर्व रा . मलगाव ता . शहादा, जगन भावसिंग पटले ह.मु. मलगाव ता . शहादा जि . नंदुरबार ह.मु. बरबडा ता . पानसेमल जि . बडवाणी ( म.प्र . ) यांना रंगेहात पकडले.

सदर कार्यवाहीत सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर करता त्यांना न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश देऊन संशयित आरोपींची नंदुरबार सेंट्रल जेल मध्ये रवानगी करण्यात आली.

सदर कार्यवाही ही वनपाल दिपक जमदाळे, भगतसिंग राजपूत , प्रियंका बिरारे , वनरक्षक गंगोत्री गवळे , प्रकाश सोनार , बादशाह पिंजारी , अनिल तावडे , जितेंद्र पवार ,संतोष चव्हाण , इलान गावित , गुलाब पावरा , वर्षा निकम , सुभाष मुकाडे , दिपक पाटिल , रेखा खैरनार वाहनचालक नईम मिर्झा यांच्या पथकाने केली. या कार्यवाहीत उपवनसंरक्षक कृष्णा भवर ,सहा वनसंरक्षक एस डी साळुंखे ,वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

बातमी शेअर करा
Previous Post

अंगणवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, तीन जण जखमी

Next Post

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

Next Post
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group