नंदुरबार | प्रतिनिधी-
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल येथील जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा जनरल सर्जन डॉ.राजेश वसावे यांना राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतर्फे गौरविण्यात आले आहे.
स्टेट हेल्थ ऍस्युरन्स सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांनी डॉ.वसावे यांना काल दि. १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सदर प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे.
या प्रशस्तीपत्रात डॉ.वसावे यांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य गोरगरीबांना खर्या अर्थाने योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव केला आहे.
याबद्दल डॉक्टर्स डे निमित्त काल दि. १ जुलै रोजी लायन्स क्लबतर्फे डॉ.राजेश वसावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सतिष चौधरी, सचिव उद्धव तांबोळी, ट्रेझरर शंकर रंगलानी, लायनेसच्या अध्यक्षा शितल चौधरी आदी उपस्थित होते.