Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री , अल्प परिचय

Mahesh Patil by Mahesh Patil
June 30, 2022
in राज्य
0
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री , अल्प परिचय

मुंबई l
श्री.एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अल्प परिचय –

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अल्प परिचय –

मुख्यमंत्री श्री.एकनाथ संभाजी शिंदे

 

जन्म : ६ मार्च , १ ९ ६४ .
जन्म ठिकाण अहिर , तालुका महाबळेश्वर , जिल्हा सातारा .
शिक्षण : बी.ए.

ज्ञात भाषा : मराठी , हिंदी व इंग्रजी .

वैवाहिक माहिती : विवाहित , पत्नी श्रीमती लता .

अपत्ये : १ ( एक मुलगा )

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य .

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी पाचपाखाडी , जिल्हा ठाणे :

इतर माहिती : ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन १ ९ ८६ मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग : ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला ; संपुर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले ; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी , सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम , इंटरर्निटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक , शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल , जॉगिंग पार्क , सेंट्रल लायब्ररी सुरु केली ; आदिवासी प्रभाग मोखाडा , तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले ; पालघर , बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप , वृक्षारोपण , आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन ; बालनाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ; ‘ जाणता राजा ‘ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन ; अध्यक्ष , ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन ; उपाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना ; पूरग्रस्तांना मदत ; ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान ; एम एम आर डी सक्षम बनविण्यात यश : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग , वांद्रे – वरळी सी लिंक , वाशी येथील तिसरा खाडीपुल , मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी खालापूर – लोणावळा टनेल मार्ग , शिळ- कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण , विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न ; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या ; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरु केले ; आरोग्य मंत्री पदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली ; आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ; ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास केला ; ठाणे मेट्रोच्या कामाला | गती दिली ; ठाणे – मुंलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मंजुरी मिळविली . ठाणे | जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या अडचणी सोडविण्यात यश ; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली ; एम एस आर डी ला | क्लस्टर योजना सुरु केली ; ठाणे जिल्हा परिषद , तसेच कल्याण – डोंबिवली , | उल्हासनगर महानगरपालिकेत व अंबरनाथ , बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची | सत्ता आणण्यात यश ; १ ९ ८४ शिवसेना शाखा प्रमुख , वागळे इस्टेट , किसननगर ; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग , १ ९९ ७ व २००२ दोन वेळा नगरसेवक , तीन वर्षे स्थायी समिती सदस्य , चार वर्षे सभागृह नेता , महानगरपालिका ठाणे ; २००४-२००९ , २०० ९ -२०१४ , २०१४-२०१९ सदस्य , महाराष्ट्र विधानसभा २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते ; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधी पक्ष नेता , महाराष्ट्र विधानसभा ; ५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१ ९ सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री ; तसेच जानेवारी २०१ ९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ; ऑक्टोबर २०१ ९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड ; डिसेंबर २०१ ९ पासून शिवसेनेचे गटनेते ; नोव्हेंबर २०१ ९ ते जून , २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) खात्याचे मंत्री ; दि . ३० जून , २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री . ( संदर्भ -१४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय )

उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

 

जन्म : २२ जुलै , १९ ७०

जन्म ठिकाण : नागपूर

शिक्षण : एलएलबी ( नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट ) , एम.बी.ए. , डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट , डी.एस.ई. बर्लिन , जर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठी , हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती : विवाहित , पत्नी श्रीमती अमृता

अपत्ये : १ ( मुलगी )

व्यवसाय : सामाजिक कार्य

पक्ष : भारतीय जनता पक्ष

मतदारसंघ : ५२ – नागपूर ( दक्षिण – पश्चिम ) , जिल्हा – नागपूर .

इतर माहिती : कार्यकारी सदस्य , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ( युनायटेड नेशन्स द्वारा मान्यता प्राप्त संस्था ) ; उपाध्यक्ष , दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी , नाशिक ( भोसला मिलिटरी स्कूल ) ; उपाध्यक्ष , राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था अध्यक्ष , स्व . आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट , नागपूर : अध्यक्ष , नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना ; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकः विविध उपक्रमात सहभाग ; १ ९ ८ ९ | वॉर्ड अध्यक्ष , भारतीय जनता पक्ष , धरमपेठ वॉर्ड , नागपूर : १ ९९ ० प्रसिद्धी प्रमुख , भाजप , नागपूर ( पश्चिम ) ; १ ९९ २ – ९ ५ अध्यक्ष , भाजप युवा मोर्चा , नागपूर शहर ; १ ९९५-२००४ उपाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश , भारतीय जनता युवा मोर्चा २००४ २०० ९ , २०० ९ -२०१४ , राष्ट्रीय उपाध्यक्ष , भारतीय जनता युवा मोर्चा ; २०० ९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख , २०१० महामंत्री २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष , महाराष्ट्र | प्रदेश भारतीय जनता पक्ष : ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व केले ; प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी , उपाध्यक्ष , ग्लोबल पार्लमेंट फोरम , हाबीतात ; १ ९९ २ व १ ९९ ७ सदस्य व १ ९९ ७ मध्ये महापौर , | महानगरपालिका , नागपूर १ ९९ ८ मेअर इन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड ; १ ९९९ -२००४ , २००४-२००९ , २०० ९ २०१४ , २०१४-२०१९ सदस्य , महाराष्ट्र विधानसभा सदस्य विधानमंडळ नियम समिती , सार्वजनिक उपक्रम समिती , विनंती अर्ज समिती , गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती सदस्य , कार्यकारी परिषद डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ; ओ.बी.सी. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न ; अध्यक्ष , निती आयोग , शेती विषयक उच्चाधिकार समिती , भारत सरकार ; राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील “ उत्कृष्ट संसदपटु ‘ पुरस्कार प्राप्त ; ‘ उत्कृष्ट वक्ता ‘ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ; रोटरी क्लबचा “ मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड ” प्राप्त ; हिंदू लॉ | विषयात नागपूर विद्यापीठाचा “ बी.के.बोस अॅवॉर्ड ” प्राप्त प्रमोदजी महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्त चंद पुणे या संस्थेतर्फे “ उत्कृष्ट संसदपट्टू ” पुरस्कार , प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत ; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत ; यशदा पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली ; ३१ ऑक्टोबर , २०१४ ते २१ नोव्हेंबर , २०१ ९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ; २२ नोव्हेंबर , ते २७ नोव्हेंबर , २०१ ९ | दुसऱ्यांदा मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य ; ऑक्टोबर , २०१ ९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड ; डिसेंबर , २०१ ९ ते जून , २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे ” विरोधी पक्ष नेते ; दि . ३० जून , २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री . ( संदर्भ १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय )

 

बातमी शेअर करा

Previous Post

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’

Next Post
‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’

‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

नंदूरबार येथे उधार सिगरेट न दिल्याने एकाचे डोके फोडले

August 11, 2022
मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

August 11, 2022
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

August 11, 2022
माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

August 11, 2022
लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

नंदुरबार येथे झोंबाझोंबी करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

August 10, 2022
नंदुरबार येथून दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार येथून दुचाकी लंपास, अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

August 10, 2022

एकूण वाचक

  • 1,877,765 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group