शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून पैशाच्या देवाण-घेवाणातून धनदाडग्यांची नावे घरकुल यादीत टाकून गरीब गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी.अन्यथा ग्रामस्थ पंचायत समिती समोर उपोषणाला बसतील असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनाचा आशय असा की, तालुक्यातील बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून ज्या लाभार्थ्यांना खरोखर घरकुलाची गरज होती त्यांना पहिल्या यादीमध्ये लाभ मिळाला नाही. परंतु ज्या लाभार्थींची नावे शेती आहे.पक्की घरे आहेत. सर्व सुखसोयींनी युक्त घरे आहेत
त्यांंची खोटी घोषणापत्रे ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने भरून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. हे सर्व पैशांच्या देवाणघेवाणीतून आहे.खरा गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिला असा स्पष्ट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
म्हणून बिलाडी त.सा.येथील घरकुल यादीतील बोगस लाभार्थी खोटी घोषणापत्र भरून पैशांची देवाण-घेवाण करून लाभार्थी झाली असून त्यांची नावे घरकुल यादीतून वगळण्यात यावी व खऱ्या गरजूंना त्यांचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीची योग्य ती दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी.अन्यथा ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर सुमारे 23 लोकांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार, तहसीलदार, जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी, गटविकास अधिकारी शहादा यांना देण्यात आल्या आहेत.