नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील तुळशी विहार कॉलनीत घरगुती भांडणाच्या कारणावरून झगडा करून रागाच्या भरात पतीने पत्नीचा चाकुने गळा कापून जिवे ठार मारल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील तुळशी विहार कॉलनी प्लॉट क्र . २२ चे वरच्या मजल्यावरील रुममध्ये राहणाऱ्या अरूण सुकलाल नामदास व त्याची पत्नी रेखा अरूण नामदास यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले त्याचा राग आल्याने
अरूण नामदास याने त्याची पत्नी रेखा नामदास
हिचा चाकुने गळा कापून जिवे ठार मारले.
याप्रकरणी अशोक देवराम खांडेकर रा . प्लॉट क्र . ६६ सरोज नगर नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात अरूण सुकलाल नामदास यांच्या विरुद्ध भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि दिनेश भदाणे करीत आहेत.