Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
June 22, 2022
in कृषी
0
हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जेव्हा जमिनीतून बाहेर पडतील त्यावेळी कडूनिंब, बोर, बाभळी यासारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास किडींचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबविण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस इत्यादी पिके तर रब्बी हंगामात गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच प्रमाणात वाढ होते. या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठयाच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पिक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते.
वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनींब, बोर या झाडांवर गोळा होतात.

अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होवून नंतर नर मादी वेगळे होतात आणि पुन्हा झाडाचा पाला खाऊ लागतात. सुर्योदयापूर्वी थोडावेळ अगोदर भुंगेरे परत जमिनीत जावून लपतात. भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळीच जमिनीतून मिलनासाठी बाहेर पडतात. २ ते ३ दिवसांनी मादी जमिनीत अडी घालण्यास सुरूवात करते. हा नियंत्रणासाठी योग्य कालावधी आहे.

पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगे यांचा नष्ट होईल.

नैसर्गिकरित्या वातावरणातील भुंगेरे, किडे हे प्रकाशाकडे आकर्षित होतात. यास्तव हुमणीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी पिवळा प्रकाश देणारा बल्ब जमिनीपासून सुमारे ३ फूट ऊंचीवर अडकवून ठेवावा. बल्ब अडकवण्यासाठी शेतातील उपलब्ध लाकडी काठ्यांचे तिकाटणे करावे.

बल्बखाली २ बाय २ फूट आकाराचा व फूट खोलीचा खड्डा घ्यावा यामध्ये उपलब्ध प्लॅस्टीक कागद टाकून त्यात अर्धा फूट ऊंचीचे रॉकेल मिश्रीत पाणी भरावे. रात्रीच्या संधी प्रकाशात वातावरणातील भुंगेरे या बल्बकडे आकर्षित होतात. बल्बखाली साठविलेल्या रॉकेल मिश्रीत पाण्यात पडून मरण पावतात. हुमणी नियंत्रणाचा हा साधा, सोपा व कमी खर्चीक आणि अतिशय प्रभावी उपाय आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राजबडीॅ गृपग्रामपंचायत येथील प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादी बाबत अखेर तिढा सुटला

Next Post

अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
आनंदाची बातमी : जिल्हा निर्मीतीच्या तब्बल २४ वर्षांनंतर या विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालय सुरु होणार

अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group