Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनामुळे आई वडीलांचे छत्र हरपल्यानंतरही गायत्रीने मिळविले ८४.४० टक्के गुण

team by team
June 20, 2022
in शैक्षणिक
0
कोरोनामुळे आई वडीलांचे छत्र हरपल्यानंतरही गायत्रीने मिळविले ८४.४० टक्के गुण

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयाच्या गायत्री वळवी या आदिवासी विद्यार्थीनीने कोरोनाने माता पिता दोघांच्या छत्र हरपल्यानंतर विपरीत परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत यश संपादीत केले असून ८४. ४० टक्के गुण मिळविले आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या थैमानामुळे अनेकांचा संसार उघडयावर पडला.

अनेक परिवार यातून सावरतांना दिसून आहे. यापैकी एक म्हणजेच दहावीचा परीक्षेत यश संपादन करणार्‍या एकलव्य विद्यालयाची गायत्री वळवी हि विद्यार्थीनी दि.३१ मे २०२१ रोजी तिच्या आईचे कोरोनाने निधन झाले.

यातून कुटूंब सावरत नाही तोच चार दिवसांनी साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले वडिलांचे दि.५ जून रोजी छत्र हरपले. अवघ्या आठवडयाभरात गायत्रीचे आई-वडील कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे ती पोरकी झाली.

तिचा मोठा भाऊ व गायत्री यांनी एकमेकांना धीर दिला. अशातच दहावीचे वर्ष असल्याने गायत्रीने स्वतः सावरले. नुकत्याच लागलेल्या निकालात गायत्रीला ८४.४० टक्के गुण मिळाले. सारा विपरीत परिस्थिमुळे तिला तिचे वर्ग शिक्षक असलेले संतोष पाटील धीर देत शिक्षणाकडे परिवर्तीत केले.

मला शिक्षक असलेल्या माझ्या वडीलांचे स्वप्न साकारायचे असल्याने जिद्दीने अभ्यास करून यश संपादीत केल्याचे गायत्री वळवी हिने सांगितले. कोरोनाचा महामारीत आई- वडीलांचे छत्र हरपले असतांना गायत्रीने मिळविलेले यश निश्‍चित कौतुकास्पद आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

व्यायाम शाळा इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर करावा : नगरसेवक प्रशांत चौधरी

Next Post

नंदुरबारचे कृणाल पवार बनले जिल्हयातील पहिले पायलट

Next Post

नंदुरबारचे कृणाल पवार बनले जिल्हयातील पहिले पायलट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add