नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील प्रभाग क्र. १७ मध्ये अडीच वर्षापासून व्यायाम शाळा इमारत बांधण्याची मागणी आहे. तरी स्थायी समितीने याला मंजूरी द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रशांत चौधरी व नगरसेविका संगिता सोनवणे यांनी याबाबतचे निवेदन प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे व मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक १७ हा प्रभाग अनुसूचित जाती जमाती राखीव प्रभाग असून या प्रभागातील आदिवासी समाजातील युवकांची अनेक वर्षापासून व्यायाम शाळा इमारत बांधण्याची मागणी आहे.
साक्री नाक्यावरील इडमाय फुलमाय मंदिराच्या पायथ्याशी अंदाजीत १० लाख खर्चाची व्यायाम शाळा बांधकामाला स्थायी समितीने त्वरीत मंजूरी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक प्रशांत चौधरी,
नगरसेविका संगिता तुकाराम सोनवणे यांच्यासह अनिल ठाकरे, दशरथ ठाकरे, राजेश वळवी, रणजित ठाकरे, आकाश पाडवी, मनिष पाडवी, सिध्दार्थ माळी, सुशिल सोनवणे, राजु भिल, आकाश ठाकरे, शंकर ठाकरे, दुर्गेश भिल, लकी, ठाकरे, अक्षय वळवी, साजन गुलाले,
राजेश पाडवी, गणेश ठाकरे, अनिल पाडवी, मंगल ठाकरे, आकाश भिल, संतोष पाडवी, सागर आनंदा माळी गोकु पाडवी, करण ठाकरे, ईश्वर ठाकरे, अशोक ठाकरे, कपुर भिल, कपुर भिल, उमेश पाडवी, गोळा ठाकरे, संदिप ठाकरे, संदिप ठाकरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.