नवापूर | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील पाटीफळी खेकडा गावातील प्राथमिक शिक्षक महेश देविदास बाविस्कर (वय ४८) यांचा लालभारी गावाजवळील रेल्वे रूळाजवळ जवळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत शिक्षकाच्या डोक्यावर जबर मार लागल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील पाटीफळी खेडका गावातील प्राथमिक शिक्षक महेश देविदास बाविस्कर नवापूर शहरातील मांदा सोसायटी येथे राहणार होते. लालभारी गावाजवळील रेल्वे पटरी जवळ रक्तानं भरलेला त्यांचा मृतदेह आढळून आले.
डोक्यावर जबर मार लागल्याने शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे .नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना माहिती प्राप्त होतात घटनास्थळी पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास पाटील, युवराज परदेशी यांनी जाऊन मृत शिक्षकाच्या शरीराची पाहणी करून पंचनामा केला.
सदरची घटना वार्यासारखी पसरल्यान मंगलदास पार्क, जनता पार्क, लालबारी भागातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पंचनामा नंतर शिक्षकांच्या शरीर शवविच्छेदनासाठी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे.