नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पालिकेच्या आज झालेल्या सर्व साधाराण सभेत नगर परिषदेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने सभेत बॅनर झळकवीले.भाजपा व सत्ताधारी सेना कॉंग्रेस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाला.दरम्यान यावेळी सर्वानुमते ९ विषय मंजूर करण्यात आले.
नंदुरबार येथे पालिकेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, वैशाली जगताप, जयसिंग गावित, संजय माळी, दिपक पाटील आदी उपस्थीत होते.
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील नविन वसाहतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या मागणी नुसार नविन २०० नग विद्युत पोल साहीत्यासह खरेदी करणे कामी येणा-या संभाव्य खर्चास मंजूरी देणे,
दि. २७ मार्च २००० पूर्वी नगरपरिषद सेवेत विशेष बाब म्हणून समावेशन झालेले/ समावेशनास मान्यता मिळालेले मयत कर्मचार्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर न.पा. सेवेत सामावून घेणे कामी विनंती प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविणे बाबत विचार विनिमय करणे.नंदुरबार नगर परिषद हद्दीतील अनुसुचित जामातीसाठी राखीव प्रभागात नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत नविन पथदिवे बसविणे ची कामे प्रस्तावित करणे आदी ९ विषयांना मंजूरी देण्यात आली.
दरम्यान काल झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी बॅनर बाजी करत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. नगर परिषदेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने पालीकेच्या सर्वसाधरण सभेत बॅनर झळकवण्यात आले.
पालीकेने रद्द केलेल्या निविदामध्ये नंदुरबार शहरातील अनेक महत्वांची काम असुन आर्थिक लागेबांध्यातुनच ही निविदा प्रक्रीया रद्द करण्यात आली आहे.नंदुरबार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज १४ कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेचा रद्द प्रकरणी भाजपातर्फे सभेत बॅनर झळकवीले.
चारूदत्त कळवणकर, विरोधी पक्षनेता भाजपा