नंदुरबार ! प्रतिनिधी
अनंत शब्दांचा पसारा आवरत-आवरत सावरत-सावरत जो शेर बांधला जातो तो शेर हजारो रसिकांचा काळजाचा ठोका चुकवतो. गझलचा शेर लिहू नये. गझलचा शेर बांधला पाहिजे. गझल बांधणे ही महत्त्वाची संकल्पना वाटते. गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार नितीन देशमुख यांनी केले.
गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या गझलामृत या ऑनलाईन महागझलोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जवळपास ३०० नामवंत मराठी गझलकारांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम सलग दोन दिवस चालला. स्वागताध्यक्ष गझलकार भूषण कटककर (बेफिकीर) पुणे होते. या कार्यक्रमाला उर्मिलामाई बांदिवडेकर, डॉ. शिवाजी काळे, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, निलेश कवडे, संजय गोरडे, शरयूताई शहा, समीर बापट, सुनंदामाई पाटील, डॉ. राज रणधीर, डॉ. स्नेहल ताई कुलकर्णी, हेमलताताई पाटील, प्रसाद कुलकर्णी, मसूद पटेल, डॉ. संतोष कुलकर्णी, कालिदास चवडेकर, जयदीप विघ्ने, शाम खामकर, सुप्रिया जाधव, अभिजीत काळे, विशाल राजगुरु, गोपाल मापारी, आत्माराम जाधव, आत्तम गेंदे, रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, शेखर गिरी, दिनेश भोसले, संदीप जाधव, राज शेळके, नंदकिशोर आगळे , डॉ. अमिता ताई गोसावी, सुनंदाताई शेळके, रुपेश देशमुख, अमोल शिरसाट आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३०० ज्येष्ठ व नवोदित गझलकार सहभागी झाले होते. सूत्रसंचालन गझलकार रत्नाकर जोशी यांनी केले. त्यांना काशीनाथ गवळी, चंद्रशेखर महाजन, डॉ रेखा देशमुख, दिगंबर खडसे, दिपाली मेहेत्रे, नंदिनी काळे, नरेशकुमार बोरीकर, नेतराम इंगळकर, पौर्णिमा पवार, प्रणाली म्हात्रे, मानसी जोशी, यशवंत म्हस्के, विष्णु जोंधळे, सुनिल बावणे, सुनेत्रा जोशी यांची साथ लाभली. महामहोत्सवाला वसुदेव गुमटकर ( देवकुमार ), उमा पाटील, संजय तिडके आणि उज्वला इंगळे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील यांच्यासह गझल मंथन परिवारातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती भरत माळी यांनी दिली.