Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

team by team
August 11, 2021
in कृषी
0
ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

नंदुरबार ! प्रतिनिधी

पीक विमा आणि पीक पाहणीची दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे यासाठी जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात महसूल आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
 ई-पीक पाहणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  प्रशिक्षणात ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  आदी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, ई-पीक पाहणीतून राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येत असल्याने गाव, तालुका, जिल्हा, विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्या विशिष्ठ पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक, तुषार सिंचन योना इत्यादीचे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होईल. कोणीही शेतकरी खातेदार पीक पाहणी ॲपबाबतच्या माहितीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
ॲपवर खातेदारांची नोंदणी एकाच वेळी करुन हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांस रेखांशासह काढलेल्या पिकाच्या फोटोसह 15 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत सर्व  खातेदार शेतकऱ्यांनी अपलोड करावयाची आहे.  मोबाईल ॲप मधून प्राप्त झालेल्या पिकाची माहिती अचूकता पडताळून तलाठी यांनी पिकांची माहिती आवश्यकतेनुसार दुरुस्त करुन कायम करावी. शेतकऱ्यांना या प्रणालीचे महत्व पटवून द्यावे. तालुका स्तरावर प्रणलीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
रविंद्र मंचरे आणि जयेश राऊळ यांनी प्रणालीबाबत प्रशिक्षण दिले. बैठकीत सादरीकरणाद्वारे ई-पीक प्रणालीची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला तहसलिदार,  कृषि अधिकारी, प्रत्येक तालुक्यातील चार मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख

Next Post
गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख

गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add