Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

team by team
February 7, 2026
in राजकीय
0
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलीस दल व प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेली कडक कारवाई योग्य व कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना (उबाठा) तर्फे व्यक्त करण्यात आले. मात्र, सक्तीच्या कारवाईपेक्षा जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत दंडाआधी हेल्मेट ही भूमिका राबवावी, अशी आगळीवेगळी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
याच मागणीचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना निवेदन दिले.

अपघातात होणारी प्राणहानी टाळण्यासाठी हेल्मेट वापर अनिवार्य आहे, हे मान्य असले तरी पहिल्याच वेळी दंड न आकारता दुचाकीस्वारांना हेल्मेट खरेदीची संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात शहरातील गांधी पुतळा, सी.बी. पेट्रोल पंप, नेहरू चौक, अंधारे चौक, धुळे चौफुली, नवापूर चौफुली व करण चौफुली या प्रमुख ठिकाणी चांगल्या दर्जाची हेल्मेट ना नफा ना तोटा तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. तसेच समाजसेवी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी, हातमजूर, गरीब व गरजवंत नागरिकांना मोफत किंवा सवलतीत हेल्मेट देण्याची सक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
हेल्मेट घेऊनही त्याचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मात्र कठोर कायदेशीर कारवाई व दंड आकारावा, असे स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत प्रथमच पकडल्या गेलेल्या नागरिकांना हेल्मेट घेण्याची एक संधी द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ. हेमंत शर्मा, उपतालुकाप्रमुख बापू महाजन, महेंद्र गिरासे, सुनील पवार, अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, किसान सेलचे तालुकाप्रमुख निंबा पाटील, उदेसिंग रामसिंग, इम्तियाज खान, जाफर शहा, बबलू नागरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

Next Post

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

Next Post
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add