नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासींची स्वतंत्र ओळख टिकविण्यासाठी देशाच्या लोकसंख्येची जनगणना होत असताना आदिवासींचा स्वतंत्र ओळख धर्मकोड कॉलम मिळावा,
या विषयी येथील देवमोगरा मंदिर नवापूर चौफुली येथे विविध आदिवासी संघटनांच्यावतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक वाहरु सोनवणे, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, पावरा समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले. सुरेश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यीक वाहरु सोनवणे म्हणाले की, आदिवासी समाजाचा स्वतंत्र धर्मकोड कॉलम मिळविण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षापासून संपूर्ण भारत देशातील आदिवासी संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून आदिवासी समाज वृक्ष, हवा, पाणी, डोंेगर, गवत यांना साक्षी मानून निसर्गाची पुजा करत असतो. तसेच यावेळी धर्मकोड कॉलम विषयक चर्चा करुन जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी तालुकास्तरावर चर्चा करुन नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी महापंचायत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात नियोजन बैठक दि.४ जून २०२२ शनिवार रोजी नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आदिवासी विविध संघटनांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. बैठकीत आदिवासी महासंघाचे ॲड. रामु वळवी, ॲड.जयकुमार पवार, कैलास वळवी,
दिनेश वळवी, माधव वळवी, अनिल वळवी, सत्यपाल नाईक, शंकर ठाकरे, युवराज पाडवी, सुरेश पाडवी, सुनिल सोनवणे, नेहमसिंग वळवी, अशोक वळवी, डॉ.जर्मनसिंग पाडवी, राजेंद्र पवार, न्हानू ठाकरे,
योगेश मोगरे, सुभाष नाईक, किरण गावीत, विजय ठाकरे, ॲड.विजय नाईक, रमेश वळवी, ॲड.शितल गायकवाड, शशिकांत वळवी, मंगलदास वसावे, नेहरु नाईक, संतोष गावीत, शशिकांत वळवी, जगदिश गावीत, इंजि.प्रकाश गावीत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भटेसिंग वसावे यांनी केले. तर आभार के.टी.गावीत यांनी मानले.