नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून गुरांची निर्दयतेने वाहतूक करतांना आढळून आल्याने नंदुरबार शहर पोलिसांनी गुरांसह वाहन असा सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात वाहन ( क्र.आर.जे .१ ९, जीएफ ५२९५ ) मधून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार सदरचे वाहन अडवून तपासणी केली असता त्यात साडेतीन लाख रुपये किंमतीचे ९ गाई , ७ गोवंश व एक बैल अशी १७ जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक होत असल्याचे आढळून आले . सदर जनावरे वाहतूकीचा परवाना नसतांना वाहतूक होत असल्याचे समजले . यामुळे साडे तीन लाख रुपये किंमतीची जनावरे व चार लाख रुपये किंमतीचे वाहन असा साडे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत भील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात महाविरसिंग भुरसिंग रा.सागरीया फाटा , जोधपूर , देवराम साधुलाराम चौधरी रा.पयेऊ जसनाथ राजस्थान व अजैय्या मोगलाईचा गुल्ला रा.कोडयापल्ली विकराबाद , तेलंगणा या तिघांविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १ ९ ६० चे कलम ११ ड मोटार वाहन कायदा कलम १ ९ ८८ चे कलम ६६ चे उल्लंघन १ ९ २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंपी करीत आहेत .