शहादा ! प्रतिनिधी
मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांना शहादा पोलिसांनी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेशा विरूध्द दाखल दोन्ही पुनर्निरीक्षण अर्ज सेशन कोर्ट शहादा यांच्याकडुन दंडासह नामंजुर करण्यात आला .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव व छायाचित्रकार मनलेश जायसवाल यांना शहादा पोलिस स्टेशनला डांबून ठेवत अमानुषपणे बेदम मारहाण व अर्वाच्य शिविगाळ करणाऱ्या शहादा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पो.नि.किसनराव नजनपाटील यांचेसह चौघे पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी
शहादा यांनी दिले आहेत या आदेशाने जिल्हयातील राजकीय सामाजिक वर्तुळासह पोलिसात खळबळ उडाली आहे . जायसवाल यांनी सदर घटनेची दि .१ जून २०२० रोजी लेखी स्वरुपात रजिस्टर पोस्टाने शहादा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती . सदर फिर्यादचे कामी विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकुन व फिर्यादचे कामी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करून तसेच वैद्यकीय अधिकारी , खाजगी डॉक्टर व प्रथमदर्शनी पुरावे तपासुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शहादा यांनी दि . ११ जून रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १५६ ( ३ ) प्रमाणे शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांना फिर्यादीतील आरोपी यांचेविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश पारीत केले आहे . मात्र अद्यापही न्यायालयाचा आदेश पारीत होऊन देखील शहादा पो.स्टेला गुन्हा दाखल झालेला नव्हता या आदेशाने तालुक्यासह जिल्हयात खळबळ उडाली होती . सदर गुन्हयाचा तपास शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दीपक बुधवंत करीत आहे . मनलेश जायसवाल यांचे वतीने दोन्ही पुनरनिरिक्षण अर्जाचे कामी सेशन कोर्ट , शहादा येथे ॲड. ब्रजेश जायस्वाल व अँड समीर टाटिया यांनी युक्तिवाद केला .