नंदुरबार ! प्रतिनिधी
शहादा व नवापूर येथील दोघा विवाहितांचा वेगवेगळ्या कारणाने छळ केल्याप्रकरणी सासरच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा येथील खोलगल्ली येथील सुनिता यांचा विवाह राहूल ठाकरे याच्याशी चार वर्षापूर्वी झाला होता . मात्र पती दारु पिऊन सुनिता ठाकरे यांना दुसरे लग्न करायचे असल्याने लग्नाच्या वेळी दिलेले झगडाचे पैशांची मागणी करीत होता . तसेच रेवकाबाई , संगिता , रोलू , संगिताचा मुलगा विक्की यांनी विवाहितेचा छळ केला . तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत सुनिता ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच नवापूर तालुक्यातील नगारे येथील ज्योती विनोद नाईक यांचा हुंड्यासाठी विनोद रामसिंग नाईक , रामसिंग रडत्या नाईक , कांताबाई रामसिंग नाईक , अन आनंदा नाईक , रोहित रामसिंग नाईक , अनिता रोहित नाईक , उषा सुकराम वळवी , प्रिती रामसिंग नाईक , दानियल रोहित नाईक यांनी विवाहितेस शिवीगाळ करीत तिचा छळ केला . तसेच आनंदा रामसिंग नाईक याने हात पकडून विनयभंग केला . याबाबत ज्योती नाईक यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात सासरच्या १० जणांविरोधात भादंवि कलम ४ ९ ८ ( अ ) , ३५४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .