नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात धडगांव ( अक्रानी ) पंचायत समिती असली गणाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . चौथ्या दिवसापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती तहसीलदार
ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली.
धडगांव पंचायत समितीच्या गणासाठी ५ जून रोजी मतदान होणार आहे . दि . १७ ते २३ मे दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे . अर्जांची छाननी २४ मे रोजी होईल .
असली गणासाठी कुठल्या पक्षाकडून कोण अर्ज दाखल करतो याकडे आता लक्ष लागून आहे . अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस ही निरंक गेला असून आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचे आहे . दरम्यान महविकासआघाडीचा फॉर्म्युला असली गणासाठी लागू झाल्यास असली प. स.ची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते.