Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे डंपरवर दुचाकी धडकली ; दोघे जखमी

team by team
May 21, 2022
in क्राईम
0
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील बायपास वळण रस्त्यावर डंपरने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी डंपरवर धडकल्याने दोघे जण जखमी झाले असून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, साक्री तालुक्यातील जैताणे येथील आनंदा रतन चव्हाण व मित्र दत्तात्रय मल्हारी जाधव हे दुचाकीने (क्र.एम.एच.१८-३००७) जैताणे येथील शिक्षक भिमराव गावीत आजारी असल्याने त्यांना नंदुरबार येथे पाहण्यासाठी जैताणे येथून नंदुरबारकडे येत होते.

यावेळी नंदुरबार शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर वळण रस्त्यावर बाळू शिवराम माळी रा.वडनेर जुमला ता.नाशिक याने त्याच्या ताब्यातील डंपर (क्र.एम.एच.१५ सीके ८६८७) भरधाव वेगात चालवून दुचाकीला ओव्हरटेक करीत असतांना अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी दुचाकी डंपरला धडकल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात आनंदा चव्हाण व मल्हारी जाधव यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला.

याबाबत आनंदा चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात डंपर चालक बाळू माळी याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जयसिंग गाावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

Next Post

असली गणाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार ?

Next Post
असली गणाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार ?

असली गणाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add