नंदुरबार ! प्रतिनिधी
नुकताच एच एस सी बोर्डाचा महाराष्ट्र राज्याचा निकाल जाहीर झाला. त्यात ग तु पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून कला,वाणिज्य,विज्ञान तिन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यात विज्ञान शाखेतून मोटवानी खुशी सुभाष या विद्यार्थिनीने 577 गुण 96.16 टक्के प्राप्त करून तिन्ही शाखेतून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकविला तर पाटील धनश्री दिनेश हिने 575 गुण 95.83 टक्के प्राप्त करून विज्ञान शाखेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केले. तसेच कु भारती केतकी सूर्यकांत हिने 570 गुण 95 टक्के प्राप्त करून विज्ञान शाखेतून तुर्तीय क्रमांक प्राप्त केले .
वाणिज्य शाखेतून कु पाटील मयुरी दौलत ने 554 गुण 92.33 टक्के प्राप्त करून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला तर बोरसे पुष्पक संजय ह्याने 542 गुण 90.33 टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक बागुल दिव्या हिने 540 गुण 90 टक्के प्राप्त करून पटकविला .
कला शाखेतून पावरा संगीता रमेश व पाडवी निशा अशोक ह्यांनी 531 गुण 88.50 टक्के प्राप्त करून संयुक्त रित्या प्रथम क्रमांक प्राप्त केले . तर द्वितीय क्रमांक वळवी मयूर इंद्रसिंग 529 गुण 88 16 टक्के प्राप्त करून प्राप्त केले. तृतीय क्रमांक वाघ हेमांग मनोज ह्याने 526 गुण 87.67 टक्के प्राप्त करून प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे न ता वी समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ.एम. एस.रघुवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.एम.जे.रघुवंशी , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन.जे. सोमाणी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते.